Categories: क्राईम

दौंड मध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची भीमा नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या, मृत्यूपूर्वी लिहिले भावाला भावनिक पत्र

अख्तर काझी

दौंड : दौंड-काष्टी मार्गावरील सोनवडी गावाच्या हद्दीत भीमा नदीवरील पुलावरून नदीपात्रात उडी मारून इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.

नाजुका शामराव ननवरे (वय 17,रा. सरपंच वस्ती भवानीनगर दौंड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 22 मे रोजी रात्री 8.45 वा. दरम्यान सदरची दुर्घटना घडली आहे. पीडित मुलीचा भाऊ पुण्याला कामाला जातो, तो दि. 22मे रोजी सायंकाळी कामावरून दौंडला घरी परत येत असताना त्याला त्याच्या चुलत भावाचा फोन आला की बहीण नाजुका कुठे आहे. या प्रश्नामुळे भावाने विचारले की काय झाले आहे, तेव्हा चुलत भावाने त्याला सांगितले की ननवरे नावाच्या मुलीने भीमा नदी पुलावरून नदीपात्रात उडी मारली आहे. तेव्हा तू चौकशी करून ये आणि मला कळव असे मुलीच्या भावाने त्याला सांगितले.

थोड्या वेळातच मयत मुलीचा भाऊ दौंडला आला व त्याने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली असता त्याला दौंड-काष्टी मार्गावरील भीमा नदी पुलावर लोकांची गर्दी जमलेली दिसली व आपली बहीण वापरत असलेली दुचाकी (MH -14,CT 3794) दिसली. घटनास्थळावर उपस्थित नातेवाईक व जमलेल्या लोकांनी नाजुका हिचा नदीपात्रात शोध घेतला असता ती मिळून आली. त्यामुळे तिला त्वरित जवळच असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ती मयत झाली असल्याचे सांगितले.

नाजुका हिने मृत्यूपूर्वी आपल्या भावासाठी एक पत्र लिहून ठेवलेले सापडले……
मी तुला दुखावले आहे मला माफ कर, तुला दुखावल्याने मला असे वाटते की माझं जगून काहीच उपयोग नाही. तुझं मन मोठं म्हणून तू माझ्यासाठी एवढे सगळे करतो. यासाठी मी तुझी आभारी आहे. मला तुझी प्रगती होताना बघायचंय. पण जाऊ दे तू नेहमी स्वतःची काळजी घे असा शेवटचा निरोप बहिणीने आपल्या भावाला देऊन आपला जीवन प्रवास संपविला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago