‘10वी बोर्डा चे निकाल आज जाहीर | अनेक नामवंत शाळेतील सावित्रीच्या ‘लेकीच’ ठरल्या ‘नंबर 1’, सांगली जिल्ह्याचा निकाल 96.08 टक्के

सुधीर गोखले

सांगली (मिरज) : प्रत्येकाच्या आयुष्याच्या सुरुवातीला ‘करियर’ करताना  काही क्षण हे खूप महत्वाचे असतात आपल्या करियर च्या दृष्टीने आपण विचार केला तर आपल्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात हि खऱ्या अर्थाने दहावी पासून होते पण बदलत्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सुद्धा दहावी ही तितकीच महत्वाची आहे. आज जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालाच्या परंपरेत सांगली जिल्ह्याने सुद्धा चांगली बाजी मारल्याचे चित्र आहे. अपेक्षे प्रमाणे यंदाही इयत्ता दहावी मध्ये सावित्रिच्या लेकींनी बाजी मारल्याचे दिसून येते.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील मधील काही नामवंत शाळांमध्ये सहकारनामा न्यूज नेटवर्क चे सांगली जिल्हा प्रतिनिधी सुधीर गोखले यांनी माहिती घेतली असता यंदाचा निकाल हा खूप चांगला असल्याची प्रतिक्रिया नामवंत शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली. मिरजेतील दि मिरज एज्युकेशन सोसायटीच्या ज्युबिली कन्या शाळेने यंदा निकालात उज्व परंपरा राखली असून तब्बल ९८.४४ टक्के इतके गुण मिळवून अग्रस्थानी आहे तसेच. मिरज विद्या समिती च्या विद्यामंदिर प्रशाला या शाळेने देखील यंदाही शाळेचा दबदबा कायम राखला असून  ८८.४८ टक्के मिळवून शाळेने आपला नावलौकिक कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे आदर्श शिक्षण संस्थेच्या आयडियल स्कुल ने देखील आपली यशाची परंपरा जोपासली आहे. शाळांचे सविस्तर निकाल पुढील प्रमाणे मिरज विद्या समिती च्या विद्या मंदिर प्रशाला या शाळेचा निकाल पुढील प्रमाणे यंदा दहावी परीक्षेत तब्बल ३१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, प्रथम व विशेष श्रेणीत एकूण १७३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.परीक्षेसाठी एकूण ३५६ विद्यार्थी बसले होते.

मिरज विद्या समिती चे अध्यक्ष शैलेश देशपांडे, कार्यवाह अनिलभाऊ कुलकर्णी, सर्व संचालक मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी, उपमुख्याध्यापक अमृतकुमार शितोळे, पर्यवेक्षक मारुती नाळे, पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले 
प्रथम क्रमांक कु. शर्वरी अरुण घनवट ९६.६०%
द्वितीय क्रमांक चि.सर्वेश शिवानंद करनाळे ९६%
तृतीय क्रमांक चि.सुमुख विश्वनाथ रानडे ९५.२०%
तसेच दि मिरज एज्युकेशन सोसायटीच्या ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेचा निकाल खालीलप्रमाणे शाळेचा एकूण निकाल  :- 98.44%
अतिविशेष गुणवत्ता (90%पेक्षा जास्त गुण) प्राप्त विद्यार्थिनी :- 20
 विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी :- 89 प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थिनी :- 101
द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थिनी :- 57 तृतीय श्रेणी प्राप्त विद्यार्थिनी :- 07
शाळेत …. प्रथम क्रमांक — कु. ताम्हनकर मृण्मयी प्रदीप :- 99%
द्वितीय क्रमांक — कु. श्रद्धा शामराव चौगुले :- 97%  तृतीय क्रमांक —
 कु. तांबडे वैदेही सचिन : 96.80% चौथा क्रमांक—-कु. बिडे मधुरा नितीन :- 95.80% पाचवा क्रमांक—कु. बागल वेदिका प्रभाकर :- 95% सर्व यशस्वी विद्यार्थिनींच्या घरी जाऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोपल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संस्थेच्या वतीने विशेष अभिनंदन आणि कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

त्याचप्रमाणे मिरजेतील आदर्श शिक्षण संस्थेने देखील यंदा हि आपली दहावी परीक्षेतील परंपरा जपली आहे कायम ठेवली आहे जरी आता संस्थेची सूत्रे नव्या पिढीकडे असली तरी या संस्थेची शिस्त स्वतः संस्थेच्या सचिव वीणा फडके यांनी जोपासली आहे. या संस्थेच्या कै उषाताई देवल यांनी खूप वर्षे या संस्थेची अगदी आपल्या मुलांप्रमाणे  देखभाल केली त्यांचाच वारसा आता वीणाताई जपत आहेत त्याचप्रमाणे नव्या पिढीतील त्यांच्या स्नुषा सौ नेहा आणि त्यांच्या सहकारी यांनी हीच परंपरा पुढे सुरु ठेवली आहे विशेष श्रेणीत 34 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 10 विद्यार्थी, आणि द्वितीय श्रेणीत चार विद्यार्थी .विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

आदर्श शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ विनिता करमरकर ,सचिव विणाताई फडके खजिनदार सौ ज्योतीताई देवल व सर्व संचालक तसेच मुख्याध्यापिका सौ राजश्री सूर्यवंशी सर्व यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी मार्गदर्शक शिक्षक व शिक्षिका या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले .प्रशालेतील प्राप्त क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक कुमारी मानसी गजानन पाटील 95.40% द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया उमेश जाधव 94.80% तृतीय क्रमांक कुमारी श्रेया सचिन घटे 93.80% या सर्वांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका वर्गशिक्षक विषय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

18 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago