वाखारी येथील हजरत शहादवल बाबा दर्ग्याच्या सुशोभीकरणासाठी 10 लाखांचा निधी



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील वाखारी येथे असणारी हजरत शहादवल बाबा दर्ग्याच्या सुशोभीकर्णाचे भूमिपूजन भीमा पाटस कारखाण्याचे मा.संचालक धनाजी नागुजी शेळके यांच्या हस्ते पार पडले.

या दर्ग्याच्या सुशोभीकरणासाठी वाखारी ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेला10 लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. 

त्यांच्या या  मागणीनुसार जिल्हापरिषदेने हा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती धनाजी शेळके यांनी दिली.

हजरत सय्यद शहामिर उर्फ शहादवल बाबा यांची वाखारी येथे दर्गा असून हि दर्गा हिंदू-मुस्लिम भाविकांच्या एकतेचे प्रतीक मानले जाते.

या कार्यक्रमाच्या भूमीपूजनावेळी धनजीभाऊ शेळके, रामचंद्र वामन शेळके, नरसिंग अबू शेळके, कमरुद्दीनभाई इनामदार, हसनअलीभाई इनामदार, इसाकभाई इनामदार, रज्जाकभाई इनामदार, मुस्तफाभाई इनामदार, मुबारकभाई इनामदार हे उपस्थित होते.