दौंड : सहकारनामा ऑनलाईन
आज दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी मा.विभागीय आयुक्त पुणे यांनी सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी सुट्टी दिली असताना सुद्धा दौंड वासियांच्या रुग्णसेवेत खंड न पडू देता दौंड उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता 107 जणांची कोरोनाची सुधारित रॅपिड अँटीजेन तपासणी करत एक आदर्श निर्माण केला आहे.
या रॅपिड अँटीजेन तपासणीने अवघ्या अर्ध्या तासात अहवाल प्राप्त होतो त्यामुळे बाधित रुग्णांना त्वरित उपचार सुरू केल्याने त्याचा पुढील धोका कमी होतो, त्यामुळे नागरिकांची गरज ओळखून दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे व त्यांच्या संपूर्ण स्टाफ ने शासकीय सुट्टी मिळाली असतानाही नागरिकांच्या आरोग्यापेक्षा सुट्टी महत्वाची नाही म्हणत आजही आपले रुग्ण सेवेचे काम सुरूच ठेवले आणि सुमारे 107 जणांची चाचणी करण्यात आली.
घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीत 107 पैकी फक्त 5 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 102 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. या मध्ये दौंड शहर 1, एस आर पी एफ गट नं 7 चे 2, आणि
ग्रामीण भागातील 2 असे एकूण 5 जण पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वय हे 25 ते 70 वर्षांच्या दरम्यान आहे.