|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील 100kv विद्युत डीपी फोडून त्यातील 45 हजार रुपयांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासुर्डी गांवच्या हद्दीमध्ये मुळा-मुठा कॅनॉलचे कडेला असणाऱ्या 100 kv विद्युत डीपीचे नट बोल्ट अज्ञात चोरट्यांनी खोलून डिपी स्ट्रक्चरवरून खाली पाडून डि.पी.मधील 100 लिटर ऑईल जमिनीवर सोडून दिले व त्यातील तांब्याच्या तारा काढून त्या चोरून घेवून गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत वरिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश नरसिंग भोसले यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.