सागर जगताप, मयुर सोनवणे या तरुणांनी घालून दिला आदर्श, 100 कुटुंबांना अन्न,धान्याचे मोफत वाटप



दौंडः सहकारनामा ऑनलाईन(सुमित सोनवणे)

कोरोना वैश्विक महामारीमुळे सर्व कामे ठप्प झाले आहेत. यामुळे गरीब कुटुंबांना मोठ्या संकटाशी सामना करावा लागत आहे. याची जान ठेऊन भिमनगर मधील राहणाऱ्या सागर जगताप आणि मयुर सोनवणे या तरुणांनी आपल्या स्वखर्चाने दौंड मधील भिमनगर, साठेनगर या ठिकाणी हातावरचे पोट असणाऱ्या १०० कुटुंबियांना गहू, तांदूळ, साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी जाऊन वाटप केले आहे. संकट काळात गरिब गरजूंना मदत करण्यासाठी हे दोघे तरुण देवदूता सारखे धावून आले आहेत.

कोरोना नावाचा विषारी संसर्ग भारत देशात पसरताच केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. या मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले, देवाण-घेवाण बंद झाली, मजूर कामगार यांचे काम बंद झाले. ज्यांचा उघड्यावर संसार आहे, ज्यांचे हातावर पोट आहे असे कुटुंब मात्र आज पोटाला काय खावे, मुला-बाळांना कसे पोसावे असा मोठा प्रश्न भिमनगर, साठेनगर या भागातील अनेक गरीब कुटुंबाना पडला होता. मात्र सागर जगताप आणि मयुर सोनवणे या दोघांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत याभागातील माहिती घेतली आणि येथील गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील लोक हाताला काम नसल्याने उपाशी राहू नये यासाठी आपल्या स्व खर्चातून अन्नधान्याची वाटप केली. त्यांच्या सोबत त्यांचे तरुण सहकारी विशाल जगताप, दत्ता जगताप आणि सागर भाऊ जगताप युवा मंचच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली. याबाबत

मयुर सोनवणे यांनी बोलताना अशा संकटाच्या काळात तरुणांनी समोर येऊन मदत करावी आणि आपल्या भागात असणाऱ्या नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन केले.