कटारिया स्कूलची 100% निकालाची परंपरा कायम



देऊळगाव राजे : सहकारनामा ऑनलाईन (प्रशांत वाबळे)

काळेवाडी (ता. दौंड)येथील सुरजबाई किसनदास कायरिया इंग्लिश मेडीयम स्कूलची १००% निकालाची परंपरा या वर्षी ही कायम राखली आहे.

प्रथम तीन आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रथम हर्षद संजय भोसले – ९१.००%,

द्वितीय पूनम चांगदेव भोसले – ८९.८०,

तृतीय प्रांजली प्रदीप कदम – ८९.६० यांनी संपादित केला. या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रेमसुख कटारिया, प्राचार्या पुजा मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग आणि पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

त्याच बरोबर देऊळगाव येथील सिद्धेश्वर विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६% लागला असून प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे 

प्रथम ऋतुजा आबा डाळिंबे -९१.४०%,

द्वितीय राहुल गोरख नागवे-९०%,

तृतीय मानसी वासुदेव आवचर-८९.२० तसेच आलेगाव येथील आलेश्वर विध्यालयाचा निकाल ९७.५०% लागला असून प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रथम साक्षी राजेंद्र सातपुते-९०%,द्वितीय अनिशा संजय निकम-८९.६०%,तृतीय माया नारायण एकाड ८७.६०गुण मिळवले आहेत या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार ,उपाध्यक्ष आनंदराव गिरमकर, सचिव हरिश्चंद्र ठोंबरे,खजिनदार संदीप नय्यर,सर्व संचालक ,देऊळगाव शाळेचे प्राचार्य आदिनाथ थोरात, आलेगाव शाळेचे प्राचार्य किसन घोलप,सर्व शिक्षक ,पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.