Categories: Previos News

बोरीबेल येथील रेल्वे भुयारी मार्गासाठी १० कोटींचा निधी मंजूर :आ.कूल यांची माहिती

दौंड : दौंड तालुक्यातील रावणगाव बोरीबेल देऊळगाव राजे मार्गावर बोरीबेल गावाजवळ रेल्वे भुयारी मार्ग (RUB) बांधण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर झाल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.

रेल्वे लाईनमुळे बोरीबेल हे गाव दोन भागात विभागले गेले असून या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी असलेल्या छोट्या मोरीतून नागरिकांना प्रवास करवा लागत होता. ही मोरी छोटी असल्याने त्यातून फक्त छोटी वाहन जात असल्याने त्या ठिकाणी मोठ्या भुयारी मार्गाची मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक करीत होते याचा विचार करून आमदार अॅड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे पाठपुरवा करून सदर निधी मंजूर करून घेतला आहे.
७ मीटर रुंद व ६ मीटर उंच असलेल्या या भुयारी मार्गामुळे नागरिकांचे दळणवळण सोपे होणार असून, मोठ्या वाहनांना रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी पार करावे लागणारे लांबचे अंतर कमी होणार आहे असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आमदार अॅड. राहुल कुल यांनी मंजूर केलेल्या या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

बोरीबेलकरांची ५० वर्षांची मागणी पूर्ण
रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेलेल्या बोरीबेलकरांना मोठी वाहने दुसऱ्या भागात जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने त्या ठिकाणी मोठा भुयारी मार्ग करण्याची मागणी ग्रामस्थ वारंवार करत होते. आमदार अॅड. राहुल कुल यांनी पाठपुरावा करून हे काम मंजूर केल्याने मागील ५० वर्षांची मागणी पूर्ण झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago