आनंदाची बातमी : कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण घटून झाले 10%, (The corona positive rate decreased) तालुक्यातील ‛या’ गावांत 90% टक्के रुग्ण निगेटिव्ह



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील यवत ग्रामिण रुग्णालयात जवळपास 40 ते 45 गावांतील लोक आपली कोरोना टेस्ट करण्यासाठी येत असतात. दि.28 एप्रिल रोजीही जवळपास 213 जण या ठिकाणी येऊन आपली कोरोना चाचणी करून गेले त्या सर्वांचा आज दि. 30 एप्रिल रोजी अहवाल प्राप्त झाला असून यातील 213 पैकी 90% टक्के म्हणजे 192 रुग्ण हे निगेटिव्ह आले आहेत तर अवघे 10% टक्के म्हणजे 8 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 13 जनांचा अहवाल अद्याप येणे बाकी असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाकडून प्राप्त झाली आहे.

प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडत असलेल्या केडगाव आणि वरवंड चा रिपोर्ट सध्यातरी झिरो आला असून यामुळे नागरिकांमध्ये फैलावत असलेला संसर्ग आता कडक लॉकडाउन मुळे आटोक्यात येत असल्याचे यातून पुढे येत आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या गावांमध्ये यवत 03, राहू 01, पिंपळगाव 01, मगरवाडी 01, कुसेगाव 01, पाटस 01 असे 08 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 4 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असून त्यांचा वयोगट 23 ते 72 वर्षांदरम्यान आहे.