Categories: Previos News

बिबट्याच्या हल्ल्यात 10 बोकड ठार, तर 9 जखमी

शिरूर : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना विषाणूने लोकांना हैराण केले असताना आता जंगली श्वापदांकडूनही नागरी वसतींवर हल्ले होऊ लागल्याने नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.

शिरूर तालुक्यात असणाऱ्या संविदणे या गावात एका शेतकऱ्याच्या शेळीपालन केंद्रावर  बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुमारे 10 बोकड ठार झाले आहेत. विनायक नरवडे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या शेळी पालन केंद्रावर  बिबट्याने रात्रीच्यावेळी हल्ला केला आहे. 

या हल्ल्यात 10 बोकड ठार झाले असून 9 बोकड जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचे 10 लाखाच्या पुढे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर

नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याबाबत वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक ऋषिकेश लाड वनकर्मचारी हनुमंत कारकुड, वनपाल चारूशिला काटे, पशु वैद्यकीय आधिकारी डॉ. गोरख सातकर, डॉ . प्रकाश ऊचाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. 

यावेळीशेतकऱ्यांनी वन विभागाने याबाबत त्वरित कारवाई करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago