लूटमार प्रकरणातील दोघांना लोणीकाळभोर पोलीसांकडून अटक, 10 हजार रुपयांसह 4 मोबाईल जप्त



लोणीकाळभोर : सहकारनामा ऑनलाईन

कुंजीरवाडी येथे वाहन चालकास तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोन युवकांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दहा हजार रुपये व चार  मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. 

लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत बाळासाहेब मोरे हे आपल्या मालकीच्या हायवा या वाहनातून मुरुम कुंजीरवाडी ते आळंदी म्हातोबा दरम्यान वाहतूक करत असताना अजय दिगंबर वाघमारे व महेश शिवाजी माने (रा.पापडेवस्ती हडपसर) यांनी मोटारसायकलवरुन येऊन हायवास आडवी लावून आम्हाला कट का मारला असे विचारुन तलवारीने हायवा गाडीच्या काचा फोडून मारहाण करत त्यांच्या कडील दहा हजार रुपये बळजबरीने काढुन घेत तिथून धूम ठोकत पळ काढला यावर मोरे यांनी तात्काळ  लोणी काळभोर पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. 

या घटनेचा पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजु महानोर रंजन रणवरे, रुपेश भगत, पोलिस हवालदार नितीन गायकवाड, मुकुंद रणमोडे, पोलिस नाईक लोकेश राऊत, शंकर साळुंखे, महेंद्र चांदणे, पोलिस शिपाई रोहिदास पारखे यांच्या पथकाने आळंदी म्हातोबा परिसरातील तरडे गावच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी या लुटमारीतील दोन तरुण पैशाची वाटणी करताना त्यांना दिसून आले. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहा हजार रुपये व चार महागडे मोबाईल जप्त केले