दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील कोरोनाचे संकट काही केल्या संपेना. दररोज कोरोनाचे नवनवीन रुग्ण सापडत असल्याने आता दौंडकरांच्या चिंता वाढू लागल्या आहेत.
आज आलेल्या ताज्या अहवालानुसार यवत 8, वाखारी 5, केडगाव 1, बोरीपार्धी 2, लडकतवाडी 4, कोरेगाव भिवर 3, राहू 1, दौंड 1, सहजपुर 1, असे एकूण 27 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. याबाबतची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.
दि. 29 ऑगस्ट रोजी एकूण 82 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते त्यामध्ये वरील 10 गावांतील तब्बल 27 पॉझिटिव्ह आल्याने या भागातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 3 वर्षांपासून ते 72 वर्षांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश असून यामध्ये 16 पुरुष आणि 11 महिला आहेत.