दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील मुख्य गावे अजूनही कोरोनाच्या रडारवर आहेत. आज दौंड तालुक्यात एकूण 10 गावांतील 26 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोळ मॅडम यांनी दिली आहे. त्यामुळे आज दिवसभरात एकूण 63 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.
आज यवत 4, केडगाव 3, बेटवाडी (गार) 2, लिंगाळी 3, पाटस 5, मळद 4, कुरकुंभ 2, देऊळगाव राजे 1, गोपाळवाडी 1, राहू 1 असे 26 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर दौंड आणि परिसरात कोरोनाच्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये आज 37 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दौंडमध्ये आज 110 रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून त्यामध्ये 37 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यात 24 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश असून 16 रुग्ण हे दौंड शहर तर 21 रुग्ण ग्रामिण भागातील आहेत.