Categories: Previos News

10 ते 17 मे पर्यंत ‛कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये’ ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्‍ह्यातील कोरोना बाधित रुग्‍णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर विधानभवनातील झुंबर हॉलमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त व अन्य विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी १० मे  ते १७ मेपर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना त्याांनी उपस्थितांना दिल्या. 

यावेळी आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्‍वाही त्यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी सध्‍या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी, त्‍यांच्‍या मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग या सर्वांनी समन्‍वय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. यासोबतच खरीप हंगामाचीही जबाबदारी जिल्‍हा प्रशासनावर येणार आहे. यामध्‍ये योग्‍य तो समन्‍वय राखून नियोजनबध्‍द काम करण्‍याच्‍या सूचना या वेेळी करण्यात आल्‍या. कोरोना रोखण्‍याच्‍या कामाला गती यावी, यासाठी महसूल विभागातील वरिष्‍ठ अधिकारी डॉ. नितीन करीर आणि महेश पाठक यांचीही नेमणूक करण्‍यात येऊन परराज्‍यातील जे मजूर आपापल्‍या राज्‍यात जाऊ इच्छित असतील, त्‍यांना रेल्‍वेनं पाठवण्‍याचं नियोजन करण्‍यात यावं. या मजुरांच्‍या प्रवासाचा खर्च राज्‍य शासन किंवा सीएसआर फंडातून (सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी) करण्‍यात येईल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून त्यापाठोपाठ पुणे हे महत्‍त्‍वाचे शहर आहे. पुणे शहरातील ज्‍या भागात कोरोना बाधित रुग्‍ण अधिक आहेत, तिथून कुणालाही बाहेर जाऊ देण्‍यात येऊ नये. राज्‍य राखीव पोलीस दलाची मदत घ्‍यावयाची असेल तर, ती सुद्धा मदत उपलब्‍ध करून दिली जाईल, असं स्पष्ट केलं गेेेलं

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago