Categories: Previos News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विक्री अधिकाऱ्यास 1 लाख 94 हजारांना लुटले, दौंड शहराजवळील धक्कादायक प्रकार



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका विक्री अधिकाऱ्यास चोरट्यांनी तब्बल 1 लाख94 हजारांना लुटल्याचा गंभीर प्रकार दौंड शहराजवळ घडला आहे. या प्रकरणी  संजय मिश्रिलाल मुनोत (वय 54, रा. अमेय अपार्टमेंट, नेनेचाळ दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.05 डिसेंबर  रोजी रात्री 9:30 ते 10 : 00. वा.चे सुमारास एका अनोळखी इसमाने फिर्यादींना कुरकुंभ येथुन दौंडकडे लिफ्ट देतो असे सांगुन भागवतवस्ती कॅनॉलच्या भरावा वरुन फायर बटाकडे नेवुन रोडमध्ये त्याचे दोन जोडीदार यांचेजवळ मोटारसायकल थांबवुन त्यांनी फिर्यादींची अंगझडती घ्यायला सुरुवात केली व सर्व माल काढुन दे, नाहीतर भोकसुन टाकीन असा दम भरला.

फिर्यादींनी घाबरून जाऊन स्वतःच्या खिशातील 10 हजार रोख रक्कम, 98 हजारांच्या हातातील दोन अंगठ्या, 62 हजारांची  गळ्यातील सोन्याची चैन, 12 हजरांचे घड्याळ व 12 हजारांचा मोबाईल काढुन दिला त्याची एकूण किंमत 1 लाख 94 हजार इतकी असून हा सर्व ऐवज तिन चोरट्यांनी चोरून नेला आहे.

याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

22 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago