दौंड : सहकारनामा ऑनलाइन
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका विक्री अधिकाऱ्यास चोरट्यांनी तब्बल 1 लाख94 हजारांना लुटल्याचा गंभीर प्रकार दौंड शहराजवळ घडला आहे. या प्रकरणी संजय मिश्रिलाल मुनोत (वय 54, रा. अमेय अपार्टमेंट, नेनेचाळ दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.05 डिसेंबर रोजी रात्री 9:30 ते 10 : 00. वा.चे सुमारास एका अनोळखी इसमाने फिर्यादींना कुरकुंभ येथुन दौंडकडे लिफ्ट देतो असे सांगुन भागवतवस्ती कॅनॉलच्या भरावा वरुन फायर बटाकडे नेवुन रोडमध्ये त्याचे दोन जोडीदार यांचेजवळ मोटारसायकल थांबवुन त्यांनी फिर्यादींची अंगझडती घ्यायला सुरुवात केली व सर्व माल काढुन दे, नाहीतर भोकसुन टाकीन असा दम भरला.
फिर्यादींनी घाबरून जाऊन स्वतःच्या खिशातील 10 हजार रोख रक्कम, 98 हजारांच्या हातातील दोन अंगठ्या, 62 हजारांची गळ्यातील सोन्याची चैन, 12 हजरांचे घड्याळ व 12 हजारांचा मोबाईल काढुन दिला त्याची एकूण किंमत 1 लाख 94 हजार इतकी असून हा सर्व ऐवज तिन चोरट्यांनी चोरून नेला आहे.
याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.