लॉक डाउनमुळे तळीरामांनीच दारू दुकान फोडत 1 लाख 80 हजाराची दारू चोरली, पोलिसांनी तिघांना केले जेरबंद



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

 पुणे जिल्ह्यातील भिगवण ता.इंदापूर येथे देशी दारूचे दुकान फोडून सुमारे पावणे दोन लाखांची दारू चोरीला गेली होती आता याचा शोध लागला असून पुणे ग्रामीण स्थानीक गुन्हे अन्वेषण विभाग LCB च्या पथकाने दारू दुकान फोडणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भिगवण येथे दिनांक १३ एप्रिल रोजी सरकारमान्य देशी दारूचे दुकान फोडून 1 लाख ,80 हजार रुपयांचा देशी दारूचा माल चोरीस गेला होता सदरच्या गुन्ह्याचा समांतर तपास LCB करीत असताना  मिळालेल्या माहितीनुसार भिगवण येथील वार्ड नं १ अशोक नगर येथील इसम राहुल  सुरेश सप्ताले (वय 28 वर्षे ) सचिन हरिभाऊ जगताप (वय 30 वर्षे) आणि  तुषार उर्फ रघु शंकर झेंडे (वय 29 वर्षे सर्व रा.अशोक नगर भिगवण ता.इंदापूर जि.पुणे) यांनी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सर्व आरोपी हे व्यसनाधीन असून त्यांनीच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी याबाबत महिती देताना सध्या लॉकडाऊन चालू असल्याने आम्हाला दारू प्यायला मिळत नव्हती व आम्ही दारू पिल्याशिवाय राहू शकत नाहीत त्यामुळे आम्ही सदर देशी दारूचे दुकान फोडले आहे त्यातील काही दारू आम्ही पिऊन घेतली आहे व काही दारू विक्री केल्याचे सांगितले तसेच उर्वरीत शिल्लक राहिलेला सदरच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील आरोपी क्र. 1 राहुल सुरेश सप्ताळे वय 28 वर्ष हा घरफोड्या करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 8 गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशन व LCB पथकाने संयुक्तरित्या केली असून या कामगिरीमध्ये सपोनि जीवन माने,पोउपनि. रामेश्वर धोंडगे, पो.ना. विजय कांचन,पोशि धिरज जाधव, पोशि अक्षय जावळे, पोशि अंकुश माने, पोशि संदीप लोंढे यांचा समावेश होता.