– सहकारनामा
मुंबई
राज्यात मागील 23 मार्च 2020 पासून लॉकडाउन सुरू झाले आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला.
विद्यार्थ्यांना कोरोना काळात घरी शिक्षण घेताना मोठ्या अडचणी येत होत्या. आता मार्च नंतर त्यांच्या परिक्षा कशा पद्धतीने होणार याबाबत पालक वर्गात चिंतेचे वातावरण होते.
मात्र आता राज्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असून या विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही हा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढत होताना दिसत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती देताना विद्यार्थ्यांना नेटवर्किंग साईट जसे युट्युब, गुगल, ऑनलाईन, ऑफलाईनच्या माध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवले होते.
मात्र 1ली ते 4थी च्या शाळा सुरु झाल्या नाही तर 5वी ते 8वी या शाळा जरी सुरु झाल्या होत्या तरी पण काही ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही.
त्यामुळे विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यानंतर बोलताना त्यांनी राज्यात सुरू असलेली कोरोनाची स्थिती बिकट बनत चालली आहे त्यामुळे आता 1ली ते 8वी च्या विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन यावर्षी करणे शक्य नाही.
त्यामुळे राज्यातील 1ली ते 8वी च्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येईल असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे सांगितले तसेच 9वी व 11वी च्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही सांगितले आहे.