Categories: Previos News

विना मास्क शहरात फिरणाऱ्या बेजबाबदार दौंडकरांना पोलिसांचा दणका, तब्बल 1 लाख 73 हजाराचा दंड वसुल

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी) 

दौंड शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊन बाधित रुग्णांची संख्या रोज वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांनी ॲक्शन मोड वर जात येथील  बेजबाबदारीने वागणाऱ्या नागरिकांवर मोठी दंडात्मक कारवाई केली. 

दौंड पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक सुनील महाडिक यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत स्वतः शहरातील प्रमुख चौकांमध्ये गस्त देत शहरात विना मास्क फिरून संसर्ग वाढीस कारणीभूत ठरू शकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत तब्बल 1 लाख 73 हजार रुपये दंड वसुली केली आहे.

शहरातील वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच येथे आढावा बैठक घेतली होती, बैठकीमध्ये शहरात कोरोना बाबत उपाय योजनांची  अंमलबजावणी न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे आदेश आयुष प्रसाद यांनी दिले होते.

त्या अनुषंगाने दौंड पोलिसांनी शहरात धडक कारवाईचे सत्र राबविले. दुचाकिंवर ट्रिपल सीट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्या वर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची सूचना दौंड पोलिसांकडून करण्यात आली  आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago