दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यामध्ये सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस दौंडची परिस्थिती कोरोनामुळे बिकट बनत चालली आहे.
आज पुन्हा दौंडच्या 16 गावांतील सुमारे 40 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, याबाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली आहे.
दौंड तालुक्यातील यवत 12, केडगाव 3, नानगाव 5, पडवी 5, वरवंड 3, राहू 1, बोरीऐंदी 1, खामगाव 1, नाथाचीवाडी 2, खोर 1, लडकतवाडी 1, सहजपुर 1, एकेरीवाडी, भरतगाव 1, दौंड 1, पुणे 1 या ठिकाणचे एकूण 40 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळू आले असून यामध्ये 28 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे.
या सर्व रुग्णांचे वय हे 1 वर्षांपासून ते 85 वर्षांपर्यंत आहे. एकूण 94 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी 54 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर उर्वरित 40 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.