Categories: Previos News

राज्यात 1 ते 4 जून दरम्यान ‛या’ कारणामुळे अतिवृष्टीची शक्यता, खबरदारीचे आवाहन



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवल्याने राज्यातील मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या काही भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले असल्याने आता त्याचा परिणाम नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पूर्वोत्तर अरबी समुद्रावरील चक्री वादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ झाल्यानंतर ते २ जूनला पहाटे उत्तरेकडे आणि नंतर उत्तर इशान्येकडे वळेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या जवळ हे वादळ ३ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज दिला जात असून या चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर १ ते ४ जून दरम्यान भरपूर पावसाची शक्यता आहे. आज दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार, अति किंवा अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो असाही अंदाज देण्यात आला आहे. तर २ आणि ३ जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात बहुतेक ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल तर थोड्या ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३ आणि ४ जूनला उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस असेल, असं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं. या सर्व घडामोडी पाहता मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

काही तासांत पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता गृहीत धरून सिंधुदूर्गपासून मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांनी काळजी घेण्याचे, समुद्रात न जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हे वादळ येण्याची शक्यता असून ते दिशाही बदलू शकतं, पण तरीही त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago