केडगावच्या तलाठ्यांकडून नागरिक, जेष्ठ महिलांना अरेरावीची भाषा, किरकोळ कामासाठी 1 लाख रुपये माघीतल्याचा माजी सरपंचांचा खळबळजनक खुलासा



दौंड : सहकारनामा

केडगाव ता. दौंड येथील तलाठी यांच्याकडून तलाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांची अडवणूक करणे, त्यांना अरेरावीची भाषा वापरणे, माझे पाहुणे आणि त्यांचे वशिले खूप मोठे आहेत त्यामुळे माझे कोणीच वाकडे करू शकत नाही असा दम देणे असे प्रकार घडत असून याबाबत  केडगाव येथील एका माजी सरपंचांना तर एका किरकोळ कामासाठी  1 लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा या माजी सरपंचांनी केडगाव येथील भर चौकात प्रतिष्ठित नागरिकांसमोर केला असल्याने एकच खळबळ माजली आहे.

जर सर्वसामान्य जनतेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी प्रतिष्ठित लोकांसोबत अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना ते कोणत्या पद्धतीने वागणूक देत असतील असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या तलाठ्यांकडून जी सर्वसामान्यांची पिळवणूक केली जात आहे त्याबाबत वरिष्ठांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केडगाव ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे.

तर केडगावचे विद्यमान सरपंच अजित शेलार, पाराजी हंडाळ, किरण देशमुख, ग्राप सदस्य अशोक शेंडगे यांनी ‛सहकारनामा’च्या माध्यमातून  केली आहे.

या तालाठ्यांमुळे केडगावमधील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि जेष्ठ महिला त्रस्त झाल्या असून या गाव कामगार तलाठ्यांवर वरिष्ठांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केडगाव ग्रामपंचायतीकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत संबंधित तलाठ्यांना वरील नागरिकांच्या आरोपांबाबत संपर्क साधला असता त्यांनी फोनवर ते काहीही आरोप करत असल्याचे सांगितले तसेच पैशांच्या आरोपांबाबत विचारले असता तुम्हाला काय लिहायचे ते लिहा असे म्हणून केलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया न देता फोन कट केला.