दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विना मास्क बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
दोन दिवसांमध्ये यवत पोलिसांकडून 600 जणांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये 1 लाख 31 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तालुक्यात कोरोनाने आपले बस्तान बसवले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावा, मास्क परिधान करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांकडून दंड वसूल केला जात आहे.