दौंड तालुक्यातील उजनी जलाशयाच्या संपादित क्षेत्रातून तब्बल 1 हजार ब्रास मातीची चोरी, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुक्यातील राजेगाव व खानवटा येथील उजनी जलाशयाच्या संपादित क्षेत्रातून तब्बल चार लाख रुपये किमतीची (1हजार ब्रास)माती चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी भीमा उपसा सिंचन उपविभागाचे (पळसदेव) उप विभागीय अभियंता संजय नारायण मेठे यांनी दौंड पोलिसात  फिर्याद दिली आहे, दौंड पोलिसांनी अज्ञाता विरोधात  गुन्हा दाखल केला आहे. 

घटनेची दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील राजेगाव हद्दीतील राजेगाव फार्म येथील व खानवटा गावातील उजनी जलाशयाच्या संपादित क्षेत्रातील गटनंबर 234 व 235 या  ठिकाणाहून चोरट्याने शासकीय रॉयल्टी न भरता अवैध पणे मातीचा उपसा करीत चोरी केली आहे,20 टिपर, 30 ट्रॅक्टर, जेसीबी मशीन, पोकलेन मशीन चा वापर करून या ठिकाणाहून अंदाजे 1000 ब्रास मातीचा उपसा करून चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.