विरोधकांनी आमच्या कार्यकर्त्यांना अरेरावी, दमदाटी करत दहशत माजवली, स्टेजचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही आम्ही सय्यम ठेवला – राहुल कुल

दौंड : विरोधक आमच्यावर दहशत, अरेरावी चे आरोप करतात मात्र ते स्वतः कायम दहशत माजवत आले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना अरेरावी, दमदाटी करतात आणि आपलं पितळ उघडं पडलं की थयथयाट करत सुटतात. विरोधक मला हुकूमशहा, दहशत माजवणारा म्हणून संबोधित करतात. आमच्या सभेच्या स्टेजचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न करतात. आमच्या सभास्थळी येऊन आमच्याच कार्यकर्त्यांवर अरेरावी केली मी मात्र सय्यमी भूमिका घेतली. विरोधक भाषण पाच मिनिटे करतात त्यात चार मिनिटे माझ्यावर टिका होते आणि नंतर विषय निघतो कारखाण्याचा. कारखाना सुरु झाला याचीच पोटदुखी या समोरच्या मंडळींना आहे. अमितभाई आणि देवेंद्रजी यांच्या योगदानाने कारखाना सुरु झाला. या भागात येत्या पाच वर्षांत शैक्षणिक संकुल उभारणार, आपले सहकार्य गरजेचे आहे.
लंके यांनी आवाहन केले मी ते स्विकारले वेळ ठरली मात्र विरोधी उमेदवार यांनी चर्चेसाठी यायचे नाकारले आणि आले नाही ते पळून गेले. समोर आल्यावर काय होतं हे तुम्ही कारखान्याच्या जनरल मिटींगला पाहिलं आहे.

जाहीरनामा, विकासनामा माझ्या हातात आहे. तो जनतेने पाहिला आहे आणि मागील प्रमाणे हाही विकासनामा पूर्ण होणार आहे. मी फक्त चेहरा आहे व्यासपीठावर उपस्थित असणारी मंडळी आणि समोर बसलेली मंडळी ही माझी खरी ताकद आहे. वारकरी संप्रदायाची मागणी मान्य करत असून दौंड येथील नगर पालिकेने सुरु केलेले कत्तलखान्या चे काम या पुढे होणार नाही याची मी ग्वाही देतो.

महायुती ने चांगली साथ दिली. विरधवल जगदाळे यांचे विशेष आभार मानले. पुणे जिल्ह्यात मी एकटाच भाजप चा उमेदवार जिंकून आलेला उमेदवार आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले २० तारखेला राहुलदादा आणि कांचनताई यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच गिफ्ट द्या. या जनसमुद्याला विराट म्हणू की विशाल म्हणू गहे मला समजेना. वीस हजार पेक्षा कमी मताधिक्य दिलं तर राज्य मंत्री आणि वीस हजारपेक्षा जास्त मताधिक्य दिलं तर कॅबिनेट मंत्रिपद देणार, मात्र मंत्रिपद देणार हे नक्की. राहुल कुल यांच्या डोक्यात फक्त जनतेचं काम एके काम च असते. त्यांचं पाण्याचं काम स्तुती करण्याजोगं आहे. खडकवासला टनेलंच काम त्यांनी मार्गी लावलं आणि आता त्यांच्या माध्यमातून मुळशी धरणाचं पाणी आता आपल्या भागात येत आहे. तुमच्या मागणीनुसार आता MIDC दौंड तालुक्यात येत आहे. अमृत, योजना, क्रीडा संकुल, रेल्वेच्या बाबतची कामे दादांनी केली. भीमा पाटस चा कारखाना अडचणीत होता मात्र राहुल दादा डगमगले नाही आणि त्यास निराणी यांनी सहकार्य केले. मात्र आम्हाला हा कारखाना सहकारीच ठेवायचा होता. त्यामुळे तो सहकारीच ठेवला. हा कारखाना भविष्यात सर्वात मोठा कारखाना आणि चांगल्या पद्धतीने चालणारा कारखाना असेल. दहा हजार रुपयांचा शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स माफ करून टाकला. आज शेतकरी आणि सहकारी कारखानदारी फक्त मोदींमुळे उभी आहे.
[18/11, 12:45 pm] Sahkarnama: आता शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल १००% माफ आहे. आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोत त्यासाठी आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार आहोत.
[18/11, 12:46 pm] Sahkarnama: ५० लाख लखपती दीदी करणार आहोत.
[18/11, 12:47 pm] Sahkarnama: शैक्षणिक संकुल करण्यासाठी तुम्ही संकल्प करा मी येथे तुम्हाला मदत करील.
[18/11, 12:48 pm] Sahkarnama: मुलींसाठी मोफत शिक्षण दिलं आणि उच्च शिक्षणासाठीची फी १००% शासन भरतंय
[18/11, 12:52 pm] Sahkarnama: या सर्व योजना बंद करा म्हणून महाविकास आघाडी कोर्टात गेली मात्र कोर्टाने ती मागणी फेटाळली
[18/11, 12:53 pm] Sahkarnama: दहा लाख तरुणांना आपण अपरेंटीस देत आहोत, व्यवसायासाठी कर्जही देत आहोत
[18/11, 12:53 pm] Sahkarnama: तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो