दौंड : अगोदर पत्नीला मारहाण केली नंतर तिचे अपहरण करून तिचा खून केला आणि नंतर मृतदेह उसात लपविणाऱ्या पतीला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आरोपी संतोष अहि-या पवार (वय 28 वर्ष राहणार खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे) याच्यावर अपहरण करून खून करणे असे वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
याने त्याची पत्नी सुरेखा संतोष पवार (राहणार खडकी तालुका दौंड) हीस मारहाण करून तिचा खून करण्याचे उद्देशाने तिला पळवून नेले होते. याबाबत चंदाबाई नाहीराज भोसले (राहणार कानडी तालुका आष्टी जिल्हा बीड) यांनी फिर्याद दिली होती.त्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम 364 अन्वये गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्यात आरोपीस अटक केल्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याने त्याची पत्नी सुरेखा संतोष पवार हीचा खुन करून तिचे प्रेत लोणारवाडी (तालुका दौंड जिल्हा पुणे) या गावच्या हद्दीतील वाळुंजकर यांच्या मालकीच्या शेतजमिनीतील असलेल्या ऊसामध्ये ठेवल्याची कबुली दिली. त्यावरून दौंड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर प्रेत मृताच्या नातेवाईकांनी ओळखल्याने सदर गुन्हयास वाढीव भादवि कलम 302,201 हे लावण्यात आले.
सदरची कामगिरीही मा.अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती ,मा. स्वप्निल जाधव सो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील दौंड पोलीस,सहा पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार, पोलीस हवालदार सुभाष राऊत, पोलीस हवालदार मलगुंडे, पोलीस हवालदार थोरात, पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड, पोलीस हवालदार गावडे, पोलीस नाईक अमीर शेख, पोलीस नाईक शरद वारे, पोलीस नाईक शैलेश हंडाळ, पोलीस नाईक भागवत, पोलीस कॉन्स्टेबल सागर गलांडे,पोलीस कॉन्स्टेबल योगेश गोलांडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते यांनी केली आहे.